खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत अगदी संपूर्ण महाराष्ट्र मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खुल्या निबंध स्पर्धेत मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले यांनी क्रमांक पटकाविला.

  शालेय गटासाठी ‘आज शिवराय असते तर‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम- अश्मी भोसले, द्वितीय-शिवानी फुटल (अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी), तृतीय-श्रावणी सावंत (कलंबिस्त इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ- दिप्ती गवसकर (सरस्वती विद्या.टांक), ईश्वरी इंगोले (मंगरूळपीर, वाशीम) यांनी क्रमांक पटकाविले. तर खुल्या निबंध स्पर्धेसाठी ‘रिल्स स्वैराचारला आमंत्रण देतात का?‘ हा विषय ठेवला होता. यात प्रथम- मंदार चोरगे (वैभववाडी), द्वितीय-किशोर वालावलकर (सावंतवाडी), तृतीय-डॉ.राजेश जोशी (सातारा), उत्तेजनार्थ-निता सावंत (सावंतवाडी), प्रितम चौगले (कणकवली) यांनी क्रमांक पटकाविले. परिक्षण डॉ.पी.आर. गावडे यांनी केले. सर्व विजेत्यांना रोख पारितोषक, प्रमाणपत्र आणि चषक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

फोटो-मंदार चोरगे, किशोर वालावलकर, डॉ.राजेश जोशी, निता सावंत, प्रितम चौगले

You cannot copy content of this page