⚡देवगड ता.०२-: तळेबाजार येथील श्री .गणेश जयंती निमित्त गणेश उत्साही मंडळ यांच्या वतीने आयोजीत होम मिनिस्टर स्पधेत प्राची मिलींद धुरी या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्यांना मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी वतीने सहा हजाराची मानाची पैठणी देऊन गौरविण्यात आले.
तळेबाजार येथे श्री गणेशाच्या ३४ व्या वर्धापण दिन सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सर्वांचे लक्ष लागलेल्या होम मिनिस्टर स्पधेत प्रथम क्रमांक प्राची मिलींद धुरी , द्वितीय क्रमांक अनिषा गजानन कुबडे, तृतीय क्रमांक अश्विनी महादेव इथापे यांनी पटकावला . या संपुर्ण स्पधेचे आयोजन रोहीत म्हापसेकर , प्रिया म्हापसेकर , दत्तप्रसाद जोईल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .या स्पधेचे सुत्रसंचलन ऋत्विक धुरी देवगड यांनी केल .
यानंतर महिलांसाठी नवीन अशी नाविन्यपुर्ण खोबरे किसने स्पर्धा घेण्यात आली. या स्पधेत प्रथम क्रमांक मनिषा ऋषिकांत धुरी , द्वितीय क्रमांक सुनिता संतोष कुबडे , तृतीय क्रमांक प्रियंजना संजय परब यांनी पटकावला .
देवगड तालुक्यातील महिलांनाही पैठणीची संधी मिळावी यासाठी २० रूपयांत लकी कुपनद्वारे पैठणीचे आयोजन करण्यात आले होते यात प्रथम क्रमांक वरेरी गावची साक्षी संतोष बावकर , द्वितीय क्रमांक तळेबाजारची करिश्मा संजय रुमडे तर तृतीय क्रमांक शिरगाव गावची अंगणवाडी सेविका दिव्या दत्तात्रय भस्मे यांनी पटकावला .
या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले . या बक्षिस वितरण सोहळ्यात व्यासपिठावर गणेश उत्साही मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर , उपाध्यक्ष अनिल मोंडकर, कार्यवाह संजय रुमडे , वरेरी गावचे माजी सरपंच संदीप तेली , सचिन हिंदळेकर , एकनाथ घाडी , रोहण म्हापसेकर, दत्तप्रसाद जोईल, नंदन घोगळेसर आदी मान्यवर उपस्थित होते .
प्राची धुरी ठरल्या तळेबाजार येथील मानाच्या पैठणीच्या मानकरी…
