दीक्षित फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने धर्मराज धुरत, प्रसाद बागवे सन्मानित…

⚡देवगड ता.०२-:
दीक्षित फाउंडेशनच्या वतीने तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूलच्या नलावडे सभागृहात शनिवारी आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमादरम्यान दीक्षित फाउंडेशनच्या वतीने आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षण संस्था या पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आले.
दीक्षित फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातवणेश्वर या प्रशालेचे पदवीधर शिक्षक धर्मराज पांडुरंग धुरत यांना तर श्री भगवती हायस्कूल मुणगे या प्रशालेचे शिक्षक प्रसाद नंदकुमार बागवे यांना गौरविण्यात आले. तर दीक्षित फाउंडेशनच्या आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्काराने विद्या विकास मंडळ जामसंडे, श्री नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ सौंदाळे या संस्थांना दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांना गौरविण्यात आले.
तसेच संस्थेच्या वतीने आयोजित रंगभरण, निबंध स्पर्धेत माध्यमिक शाळेच्या मुलांनी
सहभाग घेतला त्यांना बक्षीस देण्यात आली.
यावेळी दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री निरंजन दीक्षित, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री अजित गोगटे, अनंत करंदीकर, काका ओगले,भाई बांदकर, देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार,हिराचंद तानवडे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष नारायण माने यांनी सूत्रसंचालन संजय गोगटे यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार माधव यादव यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page