श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या 68वा पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

⚡बांदा ता.३०-: इन्सुली गावठणवाडी येथील श्री सद्गुरू राजाराम महाराज यांच्या 68वा पुण्यतिथी सोहळा शुक्रवारी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 31 रोजी सायंकाळी 6 वा दिंडी, रात्री 7.30ते 8.30 लहान मुलांचे सास्कृतिक कार्यक्रम, रात्री ठीक 9 वाजता कलानिकेतन नाट्यसंच गावठण यांची स्वामी प्रकटले भुवरी ही नाट्याकीका होणार आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी महाराज्यांचे पाद्यपुजन व आरती, दुपारी महाप्रसाद, दुपारी 3 वाजता सत्यनारायण महापूजा, संध्याकाळी 6 वाजता कलानिकेतन मंडळाचे भजन व सायंकाळी 7 वाजता श्री देव सातपाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा शिवकंठ भुषण वासुकी हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावठणवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
फोटो
श्री सद्गुरू राजाराम महाराज

You cannot copy content of this page