⚡बांदा ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार प्रवीण मांजरेकर यांच्यावर सातोसे (ता. सावंतवाडी) येथे मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारांसह राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मांजरेकर यांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, दै. प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, शेखर सामंत, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, सदस्य सचिन रेडकर, माजी पं. स. उपसभापती संदीप नेमळेकर, माजी पं. स. सदस्य शेखर मांजरेकर, शिवसेना तालुकाध्यक्ष बबन राणे, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मडुरा माजी सरपंच सुरेश परब, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, किनळे सरपंच दीपक नाईक, कवठणी माजी सरपंच शेखर गावकर, सातार्डे वाचनालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, नट वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, पाडलोस सोसायटी उपाध्यक्ष विश्वनाथ नाईक, सातार्डे माजी सरपंच उदय पारिपत्ये, सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष वसंत धुरी, बांदा माजी ग्रा. पं. सदस्य हुसेन मकानदार, दोडामार्ग तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष सुहास देसाई, मळगाव माजी सरपंच हनुमंत पेडणेकर, भंडारी समाज तालुकाध्यक्ष प्रसाद आरविंदेकर, बांदा माजी सरपंच बाळा आकेरकर, दांडेली माजी सरपंच संजय पांगम, प्रा. एन. डी. कार्वेकर, निखील नाईक, श्रीकृष्ण भोगले आदींसह दशक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी त्यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.
