वैभव नाईक:उबाठाच्या वतीने एसटी दरवाढी विरोधात आंदोलन;महायुती शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी..
कुडाळ : निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत महायुती सरकरने दिली. त्यावेळी एसटीची दरवाढ केली नव्हती पण आता
निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारने एसटीची दरवाढ केली आहे. विशेष म्हणजे परिवहन मंत्र्यांपासून कोणालाच ही दरवाढ कळली नाही. हि दरवाढ अन्यायकारक असून शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही या दरवाढीचा निषेध करतो. हि दरवाढ रद्द झाली नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. कुडाळ बस स्थानकावर आज उबाठा पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यावेळी श्री. माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एसटी दरवाढ विरोधात आज कुडाळ बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आल. महायुती सरकार विरोधात आणि दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एसटी दरवाढीचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या. यावेळी बसस्थानकावर उपस्थित महिला प्रवाशांशी माजी आमदार वैभव नाईक आणि पदाधिकारी यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले, महायुती सरकारने १५ टक्के दरवाढ केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणांना सुद्धा ५० टक्के ऐवजी आता ३५ टक्के सवलत मिळणार आहे. आज कुडाळ कोल्हापूरच्या दरात ५० रुपये, कुडाळ कणकवली साठी ११ रुपये तर सावंतवाडीची ६ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. रोज प्रवास करणाऱ्याना जवळजवळ दहा-पंधरा रुपये फरक पडलेला आहे. आज एसटी बसेसची दुरवस्था झालेली आहे. भरती होत नाही. वस्तीच्या बसेस उशिरा सोडल्या जातात आणि भारमानाचे कारण देऊन बंद केल्या जात आहेत. आज मुंबईला जाणारी एकही एसटी नाही. म्हणूनच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे आंदोलन केले आहे. ही दरवाढ थांबली नाही, रद्द झाली नाही तर अशाच प्रकारचा मोठा आंदोलन उभारू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिला
झालेली दरवाढ ही अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी देखील दिली. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेळोवेळी जनतेसाठी आंदोलन केले जाईल असे पडते यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख राजन नाईक, जान्हवी सावंत, अतुल बंगे, मंदार शिरसाट, किरण शिंदे, संतोष शिरसाट, अमरसेन सावंत, बबन बोभाटे, जयभारत पालव, गंगाराम सडवेलकर, माजी सरपंच सौ. पालव, स्नेहा दळवी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
