देवगड तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत एकेरी गटात संदीप राणे तर दुहेरी गटात योगेश कोळी व मेषक राणे प्रथम…

⚡देवगड ता.२७-: प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रेंडस सर्कल देवगड सडा आयोजित तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत एकेरी गटामध्ये संदीप राणे आणि दुहेरी गटामध्ये योगेश कोळी व मेषक राणे या जोडीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
देवगड येथील स्नेहसंवर्धक हॉलमध्ये फ्रेंडस सर्कल देवगड सडा या मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय खुल्या गटातील एकेरी आणि दुहेरी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रमोद प्रभू यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश प्रभू, उपाध्यक्ष संदीप राणे, खजिनदार सनित आचरेकर, सागर दळी, चंदन दळवी, प्रकाश जाधव तसेच फ्रेंडस सर्कलचे सदस्य शेखर सावंत, प्रशांत मालाडकर, प्रवीण सावंत, राजेश तारी, प्रवीण नळेकर, प्रवीण खडपकर, सुमित बांदेकर, रोहिदास वातकर, नितीन सावंत, किरण कुर्लेकर विकास गावडे , घनश्याम कुलकर्णी, मिलिंद कुबल संजय बांदेकर मिलिंद खडपकर सुरज प्रभू, सुरज लब्दे, सागर कुंभार आदी उपस्थित होते.
एकेरी गटामध्ये प्रथम क्रमांक संदीप राणे, द्वितीय क्रमांक विकास कुलकर्णी, तृतीय क्रमांक हेमंत गाडगीळ, चतुर्थ क्रमांक चंदन दळवी
तर दुहेरी गटामध्ये प्रथम क्रमांक योगेश कोळी व मेषक राणे, द्वितीय क्रमांक संदीप राणे व चंदन दळवी, तृतीय क्रमांक प्रकाश प्रभू व हेमंत गाडगीळ आणि चतुर्थ क्रमांक विकास कुलकर्णी व महेश रांगणेकर यांनी प्राप्त केला.
विजेत्यांना फ्रेंडस सर्कल मंडळातर्फे रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन विकास गावडे यांनी केले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page