चित्ररथ स्पर्धेत जि प प्राथमिक शाळा पेंडूर नंबर १ आणि वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाने पटकाविला प्रथम…
⚡मालवण ता.२७-:
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्या विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्ररथ स्पर्धेत इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंडूर नंबर १ तर इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टाने प्रथम क्रमांक पटकाविला
या स्पर्धेत भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन , स्वच्छता ,प्लास्टिक प्रदूषण, विविधतेतून एकता, भारतीय संविधान, ऐतिहासिक प्रसंग अशा विविध विषयांवर अतिशय कल्पकतेने सर्व सहभागी शाळांनी चित्ररथाच्या माध्यमातून विविध देखावे सादर केले. यात विद्यार्थी, शिक्षक ,पालक, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविला.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
इयत्ता पहिली ते पाचवी या गटामध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टा नंबर 1 ,
तृतीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोस सारंगवाडा
उत्तेजनार्थ पारितोषिक वराडकर हायस्कूल कट्टा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदोस,गावकरवाडा
व वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा यांनी पटकावला तर इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवडे, तृतीय क्रमांक वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांनी मिळविला,
यावेळी पंचक्रोशी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्थेचे उपाध्यक्ष , तथा वरची गुरामवाड कट्टा चे सरपंच श्री शेखर पेणकर, सचिव श्री सुनील नाईक, सचिव श्रीम. विजयश्री देसाई ,सहसचिव श्री एस. डी. गावडे शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुधीर वराडकर ,संचालिका सौ.स्वाती वराडकर संचालक श्री महेश वाईरकर, वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे ,वराडकर इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक श्री. ऋषिकेश नाईक डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी उपस्थित होते.
या स्पर्धचे परीक्षक म्हणून श्री.राजेश आजगावकर व श्री अनिल आचरेकर यांनी केली यावेळी आभार कला शिक्षक समीर चांदरकर यांनी मानले,
