सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनी” ध्वजारोहण व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न ….

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये” दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.३० वाजता सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे विश्‍वस्थ श्री . परवेज बेग यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेत पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळामध्ये पालकांबरोबरच उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत खेळाचा आनंद घेतला. तसेच केजी विभागाकडून राबवण्यात आलेल्या तिरंगी खाद्यपदार्थ स्पर्धेत अनुक्रमे नर्सरी , ज्युनियर केजी व सिनियर केजी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी इडली , मोदक ,बर्फी ,पास्ता, मॉकटेल , सॅलेड , ब्रेड डेझर्ट , चायना ग्रास यासारखे विविध पदार्थ बनवले .
फॅन्सी ड्रेस स्पर्धा , विज्ञान प्रदर्शन स्पर्धा व फुड फेस्टीवलमधील विजेत्या व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन तसेच प्रजासत्ताकदिनी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पालक शिक्षक समिती पदाधिकार्‍यांकडून बक्षीस स्वरूपात भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .
याप्रसंगी प्रशालेतील . या कार्यक्रमांला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापूरी, उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सचिव श्री .हिदायतुल्ला खान , सहसचिव श्री . सुलेमान बेग , विश्‍वस्थ श्री . परवेज बेग , श्री. मुश्ताक बागवान , श्री . खलील खान , श्री. समीर बागवान प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे सर्व पालक प्रतिनिधी ,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग , विद्यार्थी , विविध सामाजिक स्तरावरील व्यक्ती मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते . या कार्यक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page