युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन..
⚡कणकवली ता.२७-: भविष्यात रोबोटीक ही काळाची गरज आहे रोबोटीक टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या समाज हितासाठी, शेतकऱ्यांना रोबोटीक टेकनॉलॉजी ची मदत कशी होईल याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यानी घेऊन रोबोटीक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी असे प्रतिपादन प्रा दत्तात्रय उर्फ सागर सावंत यांनी केले.
AI टेक्नॉलॉजी विकसित होत आहे भविष्यात त्याची गरज आहे परंतु ज्ञान आहे तिथे विज्ञान आहे ज्ञान हे प्रगती कडे तर विग्यान हे विनाशकडे घेऊन जाते रोबोटीक्स मध्ये आपलेपणाची भावना असते बेसिक रोबोटीक्स त्याचे वेगवेगळे पैलू या दोन दिवसीय कार्यशाळेत शिकविले जाणार असून विध्यार्थ्यांनी भविष्यात रोबोटिक्स निर्मिती या क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावें असे आवाहन त्यांनी केले. युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे दोन दिवसीय बेसिक रोबोटक्स निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन सांगवे सरपंच संजय सावंत व प्रा. सागर सावंत यांच्या हस्ते दिपप्रज्वल करून करण्यात आले. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान चे संस्थापक संदेश उर्फ गोटया सावंत, अध्यक्षा संजना सावंत प्रा निर्मल सिंग ठाकूर, प्रा अमेय प्रमोद राऊत सांगवे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे शालेय समिती चेअरमन आर एच सावंत, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, विजय भोगटे राजेश सापळे रोबर्ट डिसोझा, मिलिंद बोभाटे आदी उपस्थित होते.
प्रा निर्मलासिंग ठाकूर यांनी भारताची प्रगतीसाठी अशा कार्यशाळा ग्रामीण भागात होणे गरजेचे असून संदेश सावंत यांनी चांगला उपक्रम घेतला असल्याच सांगितले तर विध्यार्थ्यान मध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची जिद्ध असली पाहिजे. प्रा. अमेय प्रमोद राऊत यांनी आपण समाजासाठी काहीतरी देण लागतो अशी भावना घेऊन समाजासाठी काम करतात तेव्हा अशा कार्यशाळा ह्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी आपल्या गावातील विध्यार्थी साठी होत असतात. संदेश सावंत यांची आपल्या गावाप्रति विध्यार्थ्यांनसाठी नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करण्यासाठी असलेली तळमळ कौतुकास्पद असल्याचे सांगितले तर मुख्याध्यापक सुमंत दळवी यांनी भविष्याची गरज ओळखून विध्यार्थ्यांना A । टेक्नॉलॉजीची माहिती मिळावी यासाठी कार्यशाळा आयोजित करावी असे आवाहन केले. प्रास्ताविक करताना विजय भोगटे यांनी यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान च्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला यावेळी ३०० विध्यार्थ्यांना रोबोटीक्स चे प्रशिक्षण दिले जाणार असून यामधून १२ विध्यार्थ्यांना मेडल दिले जाणार असून ४ विध्यार्थ्यांना रोबोटीक्स ची माहिती पुस्तक भेट दिले जाणार आहे. सूत्रसंचालन व आभार प्रा प्रसाद मसुरकर यांनी मानले यावेळी शिक्षक विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
