⚡बांदा ता.२७-: बांदा नट वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे औचित्य साधून बोस यांच्या समग्र साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, भरत गवस आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नेताजींच्या समग्र साहित्याचे उदघाटन करण्यात आले.
अनंत भाटे यांनी नेताजींच्या विविध कार्याची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब यांच्यासह वाचक, सभासद उपस्थित होते.
नट वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…!
