खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयच वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न…

⚡बांदा ता.२७-: जीवनात यशस्वी व्हायचे असल्यास विद्यार्थ्यांनी गुरुशी प्रामाणिक राहून आपले चतुरस्र व्यक्तिमत्व विकसित करावे असे आवाहन माजी मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी येथे केले.
खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी श्री जाधव बोलत होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, वार्षिक परीक्षा, शाळाबाह्य परिक्षा, कला, क्रिडा तसेच विज्ञान क्षेत्रात उत्तम प्रगती दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्वर खान म्हणाले, विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रवासात यशस्वी होण्यासाठी कष्ट आणि वाचन या शिवाय पर्याय नाही. यावेळी संस्था कार्यकारिणी सदस्य प्रविण नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली. सोबत शालेय समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संस्था, शाळा, शिक्षक आणि समाजातील दात्यानी जाहीर केलेल्या रकमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर श्री खान, श्री जाधव, सेवानिवृत्त शिक्षक गणेश गर्दे, बांदा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. जी नाईक, पर्यवेक्षक पी. एस. सावंत, जेष्ठ शिक्षक पी. यू. देसाई, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष हेमंत दाभोलकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिकेत सावंत व रणधीर रणसिंग आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक विभागाच्या अहवाल वाचनाचे काम अनिकेत सावंत यांनी केले. सूत्रसंचालन श्री रणसिंग आणि सौ. श्यामल सावंत यांनी केले.आभार पी. एस. सावंत यानी मानले.

You cannot copy content of this page