देवगडचा आठवडा बाजार ३१ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारीला…

⚡देवगड ता.२५-: दरवर्षी ३१ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा वार्षिक मेळावा आयोजित केला जातो ! गेली ३६ वर्षे कुठलाही खंड न पडता सातत्याने हे मेळावे पार पडले असून,ह्या वर्षी ३७ वा व्यापारी मेळावा वैभववाडी येथे आयोजित केला आहे.

         या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा,आठवडा बाजार बंद असतात ! या वेळी ३१ जानेवारी २०२५ रोजी वार शुक्रवार असल्याने देवगडचा आठवडा बाजार शुक्रवार ऐवजी शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी भरविण्यात येणार असल्याची माहिती देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी दिली.
You cannot copy content of this page