कुणकेश्वर हायस्कूलमध्ये भगवतगीता वाटप…

इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम..

⚡देवगड ता.२५-:
इस्कॉन पुरुस्कृत आणि सिंधु संजीवन संस्था, देवगड आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “हर घर भगवतगीता ” कार्यक्रमातंर्गत आपल्या माध्यमिक विद्यामंदिर, कुणकेश्वर या प्रशालेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भगवतगीता वाटप कार्यक्रम शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी भक्तनिवास कुणकेश्वर येथे सकाळी ठीक ११. ३० वाजता आयोजित केला.

या कार्यकामास प्रमुख प्रवक्ते श्री. श्यामकुंड प्रभु उर्फ संजय परब, श्री. आनंदवर्धन प्रभु., श्री. दाऊजी बलराम प्रभु, कुमार पाटील सर,
नेव्ही ऑफिसर मंगेश दळवी ,दृष्टी इव्हेंट्सचे प्रदीप कोकम, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष श्री. संतोष लब्दे. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट विद्यमान उपाध्यक्ष श्री. गणेश वाळके,इतर कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, सरपंच महेश ताम्हणकर आणि शिक्षक. विद्यार्थी.. ग्रामस्थ उपस्थित होते..

You cannot copy content of this page