बैलाला धडक बसल्याने तळेबाजार येथील आंबा बागायतदार गंभीर जखमी…

देवगड निपाणी मार्गावरील घटना..

⚡देवगड ता.२४-: तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास टेंबवली भेकरटाकानजीक घडला.

अधिक माहिती अशी की, तळेबाजार बाजारपेठ येथील भिकशेठ पारकर हे कामानिमित्त आपल्या ताब्यातील दुचाकीने शुव -वारी दुपारी तळेबाजारहून देवगडच्या दिशेने येत होते. टेंबवली भेकरटाकानजीक ते आले असता त्यांची दुचाकी अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकली. यात ते रस्त्यावर फेकले जात गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. या अपघाताची नोंद उशिरापर्यंत देवगड पोलीस स्थानकात नव्हती.

You cannot copy content of this page