अनन्यसाधारण असा आईच्या मायेचा सत्कार…

मंत्री आशिष शेलार:नांदोस कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार : पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती..

⚡मालवण ता.२४-: नांदोस हा माझ्या आईचा गाव असल्याने हा सत्कार अनन्यसाधारण असाच आईच्या मायेचा हात फिरावा असाच असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभाग मंत्री आशिष शेलार यांनी येथे बोलताना केले

नांदोस कट्टा गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान विभाग मंत्री आशिष शेलार यांचा नागरी सत्कार नांदोस कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्यावतीने राज्याचे कॅबिनेटमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, श्रीकृष्ण हरचांदे, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, मामा माडये, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, उपसरपंच विजय निकम, वरची गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, उपसरपंच आबा कामतेकर खरारे पेंडूर सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, प्रसाद मोरजकर, जगदीश चव्हाण यांसह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.सिंधुदुर्ग भाजपा यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार केला.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी नांदोस गावातील जुन्या आठवणीना उजाळा दिला.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री आशिष शेलार हे नेहमीच आमचे मार्गदर्शक राहिले. कोकणवार त्यांचे लक्ष नेहमीच राहिले. कोकण विकासाच्या अनेक संकल्पना ते नेहमीच मांडत असतात. असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत. यां निवडणुकीत ठाकरेंचे दुकान बंद होईल. मुंबईचा महापौर भगवाधारी हिंदुत्ववादि विचारांचा भाजपा महायुतीचा बसेल. मुंबईकर जनता व कोकणी माणूस यांचीही साथ यां विजयात असेल असाही विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला

You cannot copy content of this page