कोकण सुंदरी स्पर्धेत मालवणच्या सौ. सायली मांजरेकर द्वितीय…

⚡मालवण ता.२४-:
कोकण युवा सेवा संस्था यांच्या वतीने आयोजित ‘कोण होणार कोकणची सुंदरी (कोकण क्वीन) या स्पर्धेत मालवणच्या सौ. सायली सलील मांजरेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. सौ. मांजरेकर यांना मानाचा मुकुट, पैठणी आणि मानाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच बेस्ट इंट्रोडक्शनसाठी मानाचा मुकुट ट्रॉफी आणि पैठणी देखील सौ. मांजरेकर यांना देण्यात आली.

मुंबई भांडुप येथे कोण होणार कोकणची सुंदरी (कोकण क्वीन) ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ४५ जणींनी सहभाग घेतला होता. यातून दहा जणींची टॉप १० साठी निवड झाली. त्यातून पाच जणी महाअंतिम फेरीत पोहचल्या. अंतिम पाच जणींमध्ये मालवणच्या सौ. सायली मांजरेकर यांनीही धडक मारली. विविध फेऱ्यांमध्ये संपन्न झालेल्या अंतिम फेरीत सौ. सायली मांजरेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. सौ. मांजरेकर यांना परीक्षक सौ. स्मिता धुमाळ व सौ. श्रिया चव्हाण तसेच रुपेश कोलते आणि युवा सेवा संस्थेचे अध्यक्ष अभिजित खोटकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचा मुकुट घालून व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सौ. मांजरेकर यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page