जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५ साजरा…

सेल्फी पॉईंट ठरला खास आकर्षण..

⚡कुडाळ ता.२४-: तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आवळेगाव केंद्रामधील ११ शाळांचा समावेश होता.
शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ज्ञानी मी होणार, कथाकथन, गीतगायन, रंगभरण, श्रुतलेखन इ.चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न डिगस ग्रामपंचायत सरपंच सौ. पूनम पवार, उपसरपंच रुपेश पवार, आवळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भिकाजी तळेकर, माजी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष समीर चेऊलकर, यजमान शाळा मुख्याध्यापक संदीप देसाई, सहशिक्षक अरविंद आईर, तसेच डिगस राणेवाडी शाळा मुख्याध्यापक प्रविण खरात, सहशिक्षक अभिजित डेकाटे,आवळेगाव गावडेकट्टा मुख्याध्यापक शिवराम तावडे , संजयकुमार घाडीगावकर , शिक्षणतज्ज्ञ तांबे गुरूजी, शैलेश घोगळे उपस्थित होते. तसेच पालकवर्ग तुकाराम पवार, सुहास परब, . दिपक पाताडे,. उमेश चेऊलकर, . संजय गावडे, .सतिश पवार देखील उपस्थित होते.
निमंत्रित प्रमुख पाहुणे अडव्होकेट . सुहास सावंत, डिगस हायस्कूल माजी मुख्याध्यापक . दिपक आळवे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कडावलचे उपव्यस्थापक . दिवाकर प्रसाद, प्रदीप चेऊलकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण शाळेत रेखाटलेल्या सेल्फी पॉईंट ठरला.

You cannot copy content of this page