उपोषणाचा बनाव रचुन  कवठणी सरपंचांचे श्रेयवादाच दुर्दैवी राजकरण..

महिला व बाल कल्याण सभापती शर्वाणी गांवकर यांचा आरोप

ओरोस ता २० सावंतवाडी कवठणी रस्त्याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेताच, कामाच्या स्थितीबाबत कोणतही शहानिशा न करता आपल्या सरपंच पदाच्या अधिकाराचा गैरवापर करुन नेहमीप्रमाणे कामाचे श्रेय लाटणेकरीता १९ एप्रील २०२१ पासुन बेमुदत उपोषण करण्याची जि.प.च्या संबंधीत यंत्रणेस नोटीस बजावुन पुर्व नियोजित उपोषणाचा बनाव रचलेला होता. तसेच पक्षीय राजकारण करणेच्या उददेशाने जिल्हा परिषदेची यंत्रणा सक्षम असताना पालकमंत्र्यांच्या अधिकारात नसतानाही रविवारच्या दौ-यावेळी पालकमंत्रयांची भेट घेऊन आश्वासन मिळवुन उपोषण न करताच ते स्थगित करणेची निव्वळ स्टंटबाजी केलेली आहे.कवठणी सरंपचांची ही कृती अत्यंत दुदैवी असल्याची टिका महिला व बाल कल्याण सभापती सौ.शर्वाणी गांवकर यांनी केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कवठणी मुख्य रस्ता ते मुरडीवाडी- ख्रिश्चनवाडी-मळेबागवाडी पर्यंत रस्ता खडीकरण व डंबरीकरण करण्यासाठी १४ लाख ४० हजार रूपयांचे काम जिल्हा परिषदेच्या रस्ते विशेष दुरुस्ती ब वर्ग कार्यक्रमांतर्गत २०१९-२० आरखडयात मंजुर होणेसाठी आरोंदा जि.प.मतदारसंघाच्या सदस्या या नात्याने आपण आवश्यक पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे जि.प.बांधकाम विभागामार्फत आवश्यक ते कार्यवाही पुर्ण केलेली आहे. मात्र शासना कडुन वेळीच निधी उपलब्ध न झाल्याने सदर रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. तथापी याची जि.प.अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी तात्काळ दखल घेऊन यापुर्वीच संबंधीत यंत्रणेस सुचनाही दिलेल्या आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने स्थानिकांची गरज लक्षात घेउन सदर रस्त्याचे काम पावसाळयापुर्वीच पुर्ण करण्यात येणार असल्याची खात्री सौ.शर्वाणी गांवकर यांनी दिली होती. तसेच सध्याच्या या कोरोनाच्या संवेदनशील कालवधीत दिवसेंदिवस कमालीची वाढत चाललेली कोरोना रुग्णाची संख्या, त्या अनुषंगाने रुग्णांना अपुरी पडणारी  बेड व्यवस्था व औषध पुरवठा, रिक्त असलेली वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी पदे, रुग्णांना संदर्भ सेवेसाठी अनुपलब्ध रुग्णवाहीका  एकुणच कोलमडुन पडलेली आरोग्य व्यवस्था अशी भयावह स्थिती निर्माण झालेल्या जिल्हयाच्या आरोग्य व्यवस्थेकडे जिल्हयाचे पालकमंत्री म्हणुन संपुर्ण लक्ष केंद्रित करणेची आवश्यकता असताना पालकमंत्रयांनी आश्वासन देताना योग्य ती शहानिशा करावी असाही टोलाही सौ गांवकर यानी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात लगावला आहे..

You cannot copy content of this page