कुडाळ न प मध्ये सत्ता पालट…

नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या प्राजक्ता बांदेकर..

कुडाळ ता.२४: कुडाळ नगरपंचायत मध्ये सत्तापालट झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आता शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे. कुडाळच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धिविनायक पॅनल प्रणित उमेदवार प्राजक्ता अशोक बांदेकर यांची आज नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार उबाठा गटाच्या सई सचिन काळप यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. उबाठा गटाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्दम यांनी शिवसेना गटाला साथ दिल्याने प्राजक्ता बांदेकर यांचा नऊ विरुद्ध आठ मतांनी विजय झाला आहे.
कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज नगरपंचायत परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 60 पोलीस कर्मचारी आणि नऊ अधिकारी यासाठी तैनात होते. ओरस वरून देखील विशेष पोलीस बळ यासाठी तैनात करण्यात आला होता. मनाई आदेश देखील जाहीर करण्यात आला होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातली दुकान निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान उबाठाच्या नगरसेविका श्रुती वर्दम या प्राजक्ता बांदेकर यांच्या गाडीतूनच नगर पंचायत मध्ये दाखल झाल्याने त्याच वेळी नगराध्यक्ष कोण याची चाहूल उपस्थितांना लागली.
सकाळी 11 वाजता विशेष सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळच्या प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे तसच नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी हात वर करून निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली उबाठा गटाच्या नगरसेवक श्रुती राकेश वर्दम यांनी सिद्धिविनायक पॅनेल गटाला साथ दिल्याने सिद्धिविनायक पॅनलच्या उमेदवार प्राजक्ता अशोक बांदेकर यांचा नऊ विरुध्द आठ मतांनी विजय झाला आणि कुडाळ नगरपंचायत मध्ये सत्तापालट झाला.
कुडाळ नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी प्राजक्ता बांदेकर यांचे अभिनंदन केले आहे प्रसार माध्यमांशी बोलताना निलेश राणे म्हणाले की आता कुडाळचा विकास जोमाने होईल. गेल्या अडीच वर्षात जे झाले नाही ती विकास कामे आता नेटाने होतील. जोमाने होतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण हे करत असताना नगरपंचायतचा कारभार पारदर्शक असावा. जनतेच्या प्रश्नांची लगेच सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा या नगरपंचायतच्या प्रशासनाकडून आहे. तसेच नगराध्यक्ष बांदेकर यांना मतदान केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुडाळच्या या निवडणूक प्रक्रियेविषयी मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी नंतर माहिती दिली.
दरम्यान आमदार निलेश राणे यांना अपेक्षित काम करणार असल्याच नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितलं.
कुडाळ नगर पंचायतमध्ये सत्ता पालट झाल्याने आता कुडाळ शहराच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

You cannot copy content of this page