अजय गोंदावलेंच्या मागणीला यश; नागरिकांकडून समाधानाचे वातावरण…
⚡सावंतवाडी ता.२३-: शहरातील नवीन शिरोडा नाका ते आयटीआय पर्यंत गॅस पाईप लाईन ने खोदाई करून खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेता भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पालिका प्रशासनाचे लक्षवेधताच पालिका प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करताना नव्याने डांबरीकरण केले. पालिका प्रशासनाच्या कार्यतत्पर्तेबाबत श्री गोंदावळे यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचे आभार व्यक्त केले.
पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या बाजूने गॅस पाईप लाईन ने खुदाई करत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसानी केली होती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या खोदलेल्या चरामध्ये गाडी रुतण्याचे प्रकार घडले होते. नवीन शिरोडा नाका ते आयटीआय या रस्त्यावर मधोमध खोदाई केल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती वारंवार यामुळे या ठिकाणी अपघातासारखे प्रकार घडत होते या संदर्भात तेथील रहिवाशांनी भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले यांचे लक्ष वेधले होते श्री गोंदावळे यांनी तेथील रहिवाशासमवेत रस्त्याची पाहणी करत पालिकेचे मुख्याधिकारी श्री साळुंखे यांचे लक्ष वेधले होते. मुख्याधिकारी श्री साळुंखे याने तात्काळ घटनास्थळी येऊन रस्त्याचे पाहणी केली होती वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता श्री साळुंखे यांनी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याच्या सूचना पालिकेच्या बांधकाम विभागाला दिल्या त्यानंतर सदर रस्त्याचे काम आज हाती घेऊन नव्याने डांबरीकरण करण्यात आले.
नविन शिरोडा नाका परिसरात शाळा,हास्पिटल, शासकित कार्यालये आदी येत असल्याने या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते त्यामुळे ठराविक ठिकाणी तीन गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी रहिवांशाच्या वतीने श्री गोंदावळे यांनी मुख्याधिकारी यांच्याजवळ केली होती ही मागणीही पुर्ण करतांना तीन ठिकाणी गतिरोधकही टाकण्यात आले एकूणच रस्ता वाहतुकीस योग्य बनल्याने रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले.
