महायुतीत गैरसमज असू शकतात, पण….

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती:संघटन पर्व अभियानाला रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन..

⚡कुडाळ ता.२२-: भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे महायुतीत आहेत. काही समज गैरसमज असू शकतात. पण शेवटी आम्ही सर्वजण हिंदुत्वाच्या दिशेने जाणारे आहोत. खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे ही सर्व मंडळी या गोष्टींमध्ये नक्कीच लक्ष घालतील, असा विश्वास .भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपचे सध्या सदस्यता नोंदणी अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने रवींद्र चव्हाण यांनी आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते.
मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या संदर्भात रवींद्र चव्हाण याना विचारले असता त्यांनी आपण महायुतीत आहोत आणि आमचे ध्येय हिंदुत्व हेच आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पुन्हा समजूत घातली पाहिजे की, तुम्ही भाजपच्या विचारधारेला बांधिल आहात. तसेच नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणून सर्वच्या सर्व विषय मार्गी लावले जातील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदस्यता नोंदणी अभियानाबाबत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मध्ये आपल्याला प्रचंड फटका पडलेला आहे;त्यामुळे आता तुम्हालाच या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. कुडाळ, कणकवली,सावंतवाडी असेल तुमच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळेच नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाचे खासदार होऊ शकले. तुम्ही रुजवलेले कमळ याहीपेक्षा अधिक जोमाने टिकवून ठेवण्याची गरज आहे. तुम्ही सर्वांनी काय विचार करायचा आहे ? तो तुम्ही ठरवा. भारतीय जनता पार्टी ही शास्वत रूप आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आहेत, लोकसभेत भाजपला चांगले यश मिळाले, राज्यात सुध्दा चांगले यश मिळून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता  निवडणुका नेत्यांच्या झाल्या आहेत; कार्यकर्त्यांच्या निवडणुका अजून शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका विजयापर्यंत नेण्यासाठी व्यासपीठावरील आम्ही सर्वजण पूर्ण ताकतीने काम करणार आहोत. संघटनपर्व हा आपला पहिला टप्पा आहे. सिंधुदुर्ग मध्ये ओळखली जाणारी आयडेंटिटी आहे. तुम्हा प्रत्येकाचा एक आपापल्या गावात प्रभाव आहे. प्रवास करताना रोज जमले तर प्रत्येकाने कमळ लावायला चालू करा, वातावरण तयार होण्यासाठी सर्वात मोठी ही पद्धत आहे. दीड कोटी भारतीय जनता पार्टीचा सदस्य होणे हे भारतीय जनता पार्टीचा टार्गेट आहे, त्यामुळे प्रत्येकाने विषयाचे गांभीर्य ओळखून कामाला लागावे. ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे त्या ठिकाणी प्राथमिक सदस्य करावयाचे आहेत. पूर्ण ताकतीने आपण काम केलं पाहिजे कोणताही भाग रिकामी राहता कामा नये,याकडे सर्वांनी लक्ष असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
देशभरात भाजप सदस्यता नोंदणी अभियान ३१ जानेवारीपर्यंत सुरू आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दिशेने १ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत हे अभियान सुरू आहे. यासाठी भाजप कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत. भारतीय जनता पार्टीची विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page