अखेर जानवली सरपंचपदी भाजपाच्या शुभदा राजेश रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर…

भाजपाचा गड माजी जि.प.उपाध्यक्ष रंजन राणे, जि.प.सदस्या श्रिया सावंत यांनी राखला

*💫कणकवली दि.२०-:* लक्षवेधी ठरलेल्या जानवली ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाच्या शुभदा राजेश रावराणे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. लोकनियुक्त माजी सरपंच आर्या राणे यांच्या राजीनाम्यानंतर आज जानवली सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत प्रभारी सरपंच शिवराम राणे,आजी सरपंच आर्या राणे यांचे पती अमोल राणे व अन्य भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या जानवली सरपंच पदी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. अखेर माजी जि.विद्यमान जि.प.सदस्या श्रिया सावंत, माजी जि.प.सदस्य रंजन राणे यांनी मेहनत घेत जानवली चा गड राखला आणि भाजपाच्या शुभदा रावराणे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी पालकर यांनी शुभदा रावराणे यांची बिनविरोध जानवली सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.जानवली ग्रा.पं. मध्ये दाखल होत माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत यांनी नूतन सरपंच शुभदा रावराणे यांचे अभिनंदन केले.सरपंचपदी भाजपाच्या शुभदा रावराणे यांची निवड जाहीर होताच जि.प.सदस्या श्रिया सावंत यांनी नूतन सरपंच शुभदा याना पेढा भरवत अभिनंदन केले. किंगमेकर ठरलेले माजी जि.प.सदस्य रंजन राणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, संदीप सावंत, भगवान दळवी, पोलीस पाटील मोहन सावंत, हरेश पाटील, राजू हिर्लेकर, भाई आंबेरकर ,किर्तीकुमार राणे,मकरंद सावंत ,संतोष कारेकर यांनी नूतन सरपंचाना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, पीएसआय अनमोल रावराणे, पीएसआय जगदीश बनकर हे स्वतः जातिनिशी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

You cannot copy content of this page