डंपरचे नुकसान:जीवितहानी नाही
*💫सावंतवाडी दि.२०-:* मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे एका डंपरला अपघात झाला आहे. रात्रीच्यावेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने हा डंपर रस्त्या शेजारी असणारी झाडीत हा डंपर जाऊन पलटी झाला आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली आहे. या अपघातात डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
