*💫सावंतवाडी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हसतमुख, शांत आणि संयमी प्रेमळ फादर म्हणून ओळखले जाणारे फादर फिलीप डिसोजा यांचे दिर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या फादर या कारकिर्दीत सिंधुदुर्ग डायसिस मधील अनेक चर्च मध्ये आपली याज्ञिकी सेवा बजावली होती. येशू ख्रिस्ताची शिकवण दिली होती. फा. डिसोजा हे उत्तम प्रवचनकार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव शरीर हे अत्यंदर्शनासाठी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे दुपारी 12:30 नंतर ठेवण्यात येणार असून आज सायंकाळी 4:30 वाजता त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मोजक्याच फादर, सिस्टर्स यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फादर फिलिप डिसोजा यांचे निधन…
