आंबोली आरोग्य केंद्राला सभापतींच्या भेटी..

शर्वाणी गांवकर, निकिता सावंत यांच्यासह रेश्मा सावंत, मानसी धुरी, रोहिणी गावडे यांचा समावेश

आंबोली दि:२०: येथील आरोग्य केंद्राला आज महिला बालकल्याण सभापती शर्वणी गावकर,पंचायत समिती सभापती निकिता सावंत,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी भेट दिली. यावेळी आंबोली आरोग्य केंद्रातील डॉ. महेश जाधव,डॉ.अदिती पाटकर यांच्याशी चर्चा केली.यावेळी सरपंच गजानन पालेकर,गुलाबराव गावडे, चौकूळ सरपंच सुरेश शेटये अंगणवाडी सुपर वायझर विद्या कोटगी माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर,ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहीराम, आरोग्य सहाय्यक एस सोळंके आदी उपस्थित होते. यावेळी आंबोलीत आतापर्यंत १०३ कोरोना बाधित झाले.सध्या ९ बाहेर उपचार घेत आहेत तर ९ पॉ जिटिव गृह अलगीकरणं आहेत.अशी माहिती डॉक्टर जाधव यांनी दिली.यावेळी लॅब चा विषय संतोष पालेकर यांनी मांडला.आंबोली आरोग्य केंद्रातील ओपिडी ची माहिती सभापती सावंत यांनी घेतली.यावेळी अंगणवाडी येथे १० टक्के निधी १५ वित्त आयोगाच्या रकमेतून लाईट बिल साठी भरणे साठी ठेवायचा आहे.असे सौ.रेश्मा सावंत यांनी सांगितले. सरपंच गजानन पालेकर यांनी नांगरतास येथे उपकेंद्र शिफ्ट करावे अशी मागणी केली.त्याठिकाणी ६ वाडीसाठी सोय होईल.त्याठिकाणी स्टाफ नाही डॉक्टर नाही असे डॉक्टर जाधव यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहिणी गावडे यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण मीटिंगमध्ये विषय मांडला होता त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याचे म्हटले आहे.यावेळी सरपंच यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलीपे यांच्याकडे फोन वर चर्चा केली. चौ कुळ येथील डॉक्टरांना ४ दिवस तिकडे त्यानंतर तिकडे बसायला सांगा.तात्पुरते तिकडे ओपीडी करा.यावेळी सदस्य रेश्मा सावंत यांनी डॉ. खलीपे यांच्याशी चर्चा केली.यावेळी जागा उपलब्ध आणि इतर समस्यांबाबत चर्चा झाली.

You cannot copy content of this page