मळेवाडमध्ये सुद्धा रॅपिड टेस्ट..

विनाकारण फिरणाऱ्याना चाप:२७ जणांची केली तपासणी

*💫सावंतवाडी दि.२०-:* मळेवाड येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय गाव कृती समितीने घेतला असून, आतापर्यंत २७ जणांना टेस्टसाठी पाठविण्यात आले आहे. वारंवार आवाहन करूनही विनाकारण गर्दी करत असल्याचे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच हेमंत मराठे, ग्रामसेवक अनंत आजगावकर, पोलीस हे कॉ विजय केरकर, महीला पोलीस दीपिका मटकर, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, आरोग्य सेविक बाबली गवंडे, आरोग्य सेविका मोरे, आशा सेविका, अनुश्री नाईक, ग्रा सदस्य मधुकर जाधव, लिपिक सखाराम जाधव, शिपाई सिद्धेश मुरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page