देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून मान्यता…

⚡देवगड ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड हे कोकण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांतून देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रामध्ये सध्या पदार्थविज्ञानामधील मूलभूत संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमासह पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि आता पीएच. डी पर्यंतचे शिक्षण आणि संशोधन करण्याची संधी देवगड महविद्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रासाठी डॉ. सुनेत्रा ढेरे आणि डॉ. लक्ष्मण सुरवसे हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. या केंद्रातून पी एच. डी. करावयाची असल्यास NET/ SET/ PET पात्र विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेश सूचना जाहीर करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page