दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच मार्फत तालुका स्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन..

⚡देवगड ता.१५-:
दीक्षित फाऊंडेशन मार्फत तालुक्यामधील शाळांना विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम व आर्थिक सहकार्य केले जाते. याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक विचार मंचामार्फत १६ जानेवारी २०२५ रोजी निरंजन दीक्षित यांच्या मातोश्री कै. निता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, विद्यार्थ्यांना चित्र पुरविले जाईल, रंगकामासाठी लागणारे साहित्य इत्यादी विद्यार्थ्यांनी स्वतः आणावयाचे आहे, स्पर्धा आपल्याच शाळेमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी घ्यावयाची आहे., चित्राच्या वरील बाजूस शाळेचे नाव व स्पर्धकाचे नाव लिहावयाचे आहे, स्पर्धक विद्यार्थ्यांनी शाळेतच चित्र पूर्ण करावयाचे आहे, सहभागी प्रशालेने प्रत्येक गटातील तीन विद्यार्थ्यांची चित्रे १७ जानेवारी २०२५ केंद्र प्रमुखांकडे द्यावयाची आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकाची चित्रे केंद्रप्रमुखाकडे देताना शाळा स्तरावरील निकालपत्रक व विद्यार्थी सहभागाबाबत विहित नमुना माहिती पाठविण्यात आलेला फॉर्म भरून पाठवावा. स्पर्धा तीन गटांमध्ये घेतली जाणार आहे. गट क्रमांक १ इयत्ता पहिली ते चौथी, गट क्रमांक २ – इयत्ता पाचवी ते सातवी, गट क्रमांक ३ इयत्ता आठवी ते नववी. ज्या मराठी शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग आहे, त्यांनी गट क्रमांक ३ मध्ये सहभागी झालं तरी चालेल. त्यांना प्रवेश दिला जाईल.
तालुक्यातील प्रत्येक केंद्रामधून प्रत्येक गटातून पहिल्या क्रमांकासाठी बक्षिस दिले जाईल. हे बक्षिस प्राथमिक शाळांतील स्पर्धकासाठीच असेल. तालुकास्तरावर प्राथमिक विभागासाठी तीन बक्षिसे दिली जातील. तर माध्यमिक विभागासाठी पाच बक्षिसे दिले जातील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता नलावडे सभागृह, जामसंडे हायस्कूल येथे संपन्न होईल.

You cannot copy content of this page