हत्तींशी मराठीतून बोलणारा माणूस आनंद शिदे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१५-: बॅ.नाथ पैंच्या ५४व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हत्तींशी मराठीतून बोलणारा माणूस तथा ट्रंक कॉल फाऊंडेशनचे संस्थापक आनंद शिदे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन १८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील बॅ.नाथ पै समुदाय केंद्र येथे केले आहे.

  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार दीपक केसरकर हे भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल पाटील व सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी हे तसेच सिधुदुर्ग डी.एफ.ओ.नवकिशोर रेड्डी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तहसीलदार ओंकार ओतारी, दै. तरूण भारत आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर व राजन गिरप, बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन बॅ.नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट आणि बॅ.नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ यांनी केले आहे.

फोटो – आनंद शिदे

You cannot copy content of this page