⚡वेंगुर्ला ता.१५-: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या अभियानांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात कथाकथन सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कांदबरी मस्के, सोनाली चेंदवणकर आणि सानिया वरसकर या विद्यार्थींनीनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा.वामन गावडे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.एस.जी चुकेवाड, प्रा.राम चव्हाण, प्रा.डी.आर.पाचपिले, प्रा.एल.बी.नैताम, प्रा.जे.वाय.नाईक, प्रा.सचिन परूळकर, प्रा.विवेक चव्हाण, प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिक देण्यात येणार आहे.
