संजू विरनोडकर टीमकडून सावंतवाडी शहरात निर्जतुकीकरण..

रॅपिड टेस्टमध्ये बाधित मिळाल्याने तात्काळ राबविली मोहिम

*💫सावंतवाडी दि.२०-:* शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत असून यामध्ये एका व्यक्तीचा कोव्हीड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत जंतूनाशक फवारणी केली आहे. आरोग्य यंत्रणेच्या किट्ससह ये-जा करणारी वाहनही सॅनिटायझ करण्यात आली. यात सामाजिक कार्यकर्ते सुधाकर राणे यांनी देखील सहभाग घेतला होता. संजू विर्नोडकर यांनी तात्काळ येत निर्जंतुकीकरण केल्याबद्दल आरोग्य व पोलीस प्रशासनाकडून त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.

You cannot copy content of this page