सावंतवाडीत खळबळ आरोग्य, पोलिसांची संयुक्त कारवाई
*💫सावंतवाडी दि२०-:* शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आरोग्य, पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत असून यामध्ये एका व्यक्तीचा कोव्हीड रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, बाबासो बाबर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या कोरोनाबाधीत व्यक्तीला शहरातील कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
