कमळ प्रतिष्ठानची मागणी
*💫मालवण दि.२०-:* संपूर्ण महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णात वाढ होत आहे. तसेच भविष्यात ही बाब अधिक भयानक व गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे यावर वेळीच जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन कमळ प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या ठिकाणी किमान ५० बेडचे कोविड सेंटर उभे केल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालय आणि प्रशासनावर येणारा ताण कमी होईल. तसेच इतर गोष्टी देखील साध्य होतील. त्यामुळे तात्काळ तालुक्याच्या ठिकाणी ५० बेडचे कोविड सेंटर उभारून त्यात आवश्यक त्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी कमळ प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी केली आहे.
