⚡मालवण ता.११-:
नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित ‘सामुहिक वाचन’ हा उपक्रम ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी ग्रंथालयातील विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. वाचकांनी प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली जिल्हा ग्रंथालय सिंधुदुर्ग यांच्या सूचनेप्रमाणे दि. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये, ग्रंथालयांमध्ये सुरू आहे. या अंतर्गत नगर वाचन मंदिरात आयोजित सामुहिक वाचन या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षक व वाचक विनायक कोळंबकर आणि ग्रंथालयाच्या नियमित वाचकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमात विनायक कोळंबकर, अक्षय सातार्डेकर, पांडूरंग क्षिरसागर, दुर्वेश पवार, आनंदी सातार्डेकर त्याचप्रमाणे ग्रंथपाल संजय शिदि, सहाय्यक ग्रंथपाल श्रेया चव्हाण, लिपिक प्रतिभा पेडणेकर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय शिंदे यांनी केले.
