⚡मालवण ता.१०-: भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने ऑक्टोबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुनील नारायण जाधव (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकवला असून मोहन लाडू जाधव (सावंतवाडी) यांनी द्वितीय व चंद्रशेखर मोहन जाधव (सावंतवाडी) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
जून महिन्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, कट्टा येथे दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींची ऑक्टोबर महिन्यात कणकवली येथील केंद्रावर लेखी व तोंडी अशी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये प्रवीण हरिश्चंद्र कदम (कणकवली), रामचंद्र वालावलकर (कुडाळ), विजय विश्राम नेमळेकर (सावंतवाडी), संग्राम सतीश कासले (मालवण), सखाराम सिताराम कदम (कुडाळ) हे देखील उत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण बौद्धाचार्य व श्रामणेर यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, संस्कार विभाग उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर, सचिव सुनिल जाधव व जिल्हा कार्यकारणीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
