⚡सावंतवाडी ता.१०-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याच्या योजनेचे काम सुरु करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत गरड व झिरंग भागात उंच सलोह टाक्यांचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करणे, पाळणेकोंड धरणावर व केसरी बंधाऱ्यावरून सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर, चीवार टेकडी, गरड व झिरंग येथील प्रस्तावित पाण्याच्या टाकीपर्यंत पाण्याची नवीन पाईप लाईन घालणे, सावंतवाडी शहरामध्ये वितरण व्यवस्थेसाठी नवीन पाण्याच्या पाईप लाईन घालणेचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील पाण्याच्या पाईप लाईन घालण्यासाठी रस्ते खोदाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी वाहने वगैरे सावकाश चालवावी लागतील तसेच काहीवेळा पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. रस्ते खोदाई करताना अस्तित्वातील पाण्याची पाईप लाईन फुटण्याची किंवा नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. अशावेळी पाणीपुरवठा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही वेळा शहरातील पाणी पुरवठ्याबाबत गैरसोय होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे अशी विनंती न.प. प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
सावंतवाडी पाणी पुरवठा योजना सुधारित करण्याच्या योजनेचे काम सुरु…!
