झाराप झिरो पॉईंट ते पत्रादेवी महामार्गवरील खड्डे बुजवा…

अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन:महामार्ग अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा..

बांदा/प्रतिनिधी
झाराप झिरो पॉईंट ते पत्रादेवी या महामार्गवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे हे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. हे खड्डे येत्या पंधरा दिवसात बुजवावेत अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे दाखवत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.

यावेळी जिल्हा अध्यक्ष अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष राजू कासकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, तालुका सचिव सतीश आकेरकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष केतन सावंत, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष साहिल तळकटकर आदी उपस्थित होते.
यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी आपल्या कार्यालयाला कल्पना देऊनही याबाबत कार्यवाही करण्यात आली नसल्याबाबत जाब विचारला. सध्या पर्यटन हंगाम सुरु असल्याने वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात तातडीने महामार्गवारील खड्डे बुजवावेत. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यास भाग पाडू नये असा इशारा देण्यात आला.

You cannot copy content of this page