वेंगुर्ले बंदर किनारी राबविली स्वच्छ्ता मोहीम…

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेचा उपक्रम..

बांदा/प्रतिनिधी
श्री श्री १०८ महंत मठाधिश प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज संस्थापीत, श्री सदगुरु भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडी या सामाजीक संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीमेतून वेगुर्ला येथील वेगुर्ले बंदर समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, विश्वस्त देवीदास रेडकर, मनीष नाईक, योग शिक्षक दिलीप सुतार, प्रदीप घाडी, गावडे काकांचे भक्तगण व कणकवली, सावंतवाडी, कारीवडे येथील महीला सेवेकरी उपस्थित होते. या संस्थेच्या माध्यमातून रोगानुसार योगा, अनेक योग शिबीरे, विद्यार्थी दत्तक योजना, निराधाराना आधार योजना, अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम, कॅन्सरग्रस्त रूग्णाना आर्धीक मदत अशा अनेक योजना व सामाजीक कार्यक्रम या वर्षी राबवीले जाणार आहेत असे योगा प्रमुख मनीष नाईक यानी यावेळी सांगीतले.

You cannot copy content of this page