⚡मालवण ता.०९-:
एम क्रिकेट अॅकॅडमी, सावंतवाडी तर्फे स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रिमीयर लीग १६ वर्षाखालील वयोगट क्रिकेट स्पर्धा दि. १० जानेवारी रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन सकाळी ९ वा. मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन एम क्रिकेट अॅकॅडमीचे अध्यक्ष व सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, एम क्रिकेट अॅकॅडमीचे उपाध्यक्ष व सावंतवाडीचे माजी नगरसेवक ऍड. परिमल नाईक यांनी केले आहे.
मालवणात उद्यापासून स्व. राजनभाई आंगणे प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…
