Headlines

_माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली शरद पवार व जयंत पाटील यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांचा मुंबई निवासस्थानी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोंसले यांनी सदीछा भेट घेऊन त्यांना व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटी मध्ये लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका सहकार ग्रामपंचायत निवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्व बळावर वेळ पडल्यास लढवण्याची तयारी ठेवली पाहिजे, त्याच बरोबर कार्यकर्त्यांनी महविकास आघाडीचे अस्तित्व महाराष्ट्रात आहे व पुढेही राहणार आहे याचेही भान सर्व स्तरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ठेवले पाहीजे, अशीही सूचना राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार यांनी या चर्चेच्या माध्यमातून दिल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यानी सांगीतले.
दुपारी यशवंतराव प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार आमदार जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रतीनीधी यांच्या मीटिंगमध्ये राष्ट्र वादी काँग्रेस पुन्हा सर्व स्तरावर लावकरच उभारी घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page