बांद्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०९-: महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ४० हून अधिक दात्यांनी रक्तदान केले. तसेच १५० हून अधिक जणांची आरोग्य चिकित्सा करण्यात आली.
येथील व्यापारी भुवनच्या श्री विठ्ठल रखुमाई सभागृहात संपन्न झालेल्या या आरोग्य शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विकास बडवे, राज्य उत्पादन शुल्क खात्याचे दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीताराम गावडे, एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पडवेचे मनीष यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य चिकित्सा करून त्यांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. एसएसपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालय पडवे यांच्या वैद्यकीय पथकाने आरोग्य चिकित्सा केली. यावेळी ४० हून अधिक दात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व रुग्णांसाठी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली होती.
संपूर्ण दिवसभरात अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, शैलेश केसरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष शेखर बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर, हनुमंत सावंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, प्रसाद वाळके, डॉ. संदीप फाऊंडेशनचे खजिनदार मंगलदास साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले, सिंधु रक्तमित्रचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य निलेश मोरजकर, अक्षय मयेकर यांच्यासह पोलीस ठाणे अंतर्गत सर्व गावांचे पोलीस पाटील, होमगार्ड, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील संघटनेचे तालुका उपाध्यक्ष नितीन नाईक यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी मानले.

You cannot copy content of this page