ज्येष्ठ नाट्यकर्मी नंदू पाटील यांना राजीव शिदे स्मृती पुरस्कार…

⚡वेंगुर्ला ता.०९-: ज्येष्ठ नाट्यकर्मी कै.राजीव शिदे यांचे कलावलय परिवाराशी अतिशय निकटचे संबंध होते. कलावलयने सादर केलेल्या काही नाटकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाण्यासाठी यावर्षीपासून कलावलय वेंगुर्लातर्फे पुरस्कार देण्यात येणार असून सावंतवाडी येथील ज्येष्ठ रंगकर्मी नदू पाटील यांना हा पहिलाच पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच जिल्ह्यातील नाट्यलेखकांचाही सन्मान केला जाणार आहे.

  नंदू पाटील हे गेले कित्येक वर्षे नाटक, मालिका, चित्रपट, जाहिरात या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख ५ हजार, शाल, श्रीफळ व  सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा कलावलयतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे. याच कार्यक्रमात सिधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांचे योगदान रंगभूमीला लाभले आहे. त्यातील लेखकांचा सन्मान होणार आहे. यामध्ये केदार देसाई (कुडाळ), प्रसाद खानोलकर व सुहास खानोलकर (पिगुळी), विजय चव्हाण (कणकवली), अरविद म्हापणकर व वैशाली पंडित (मालवण), पद्मा फातर्फेकर (सावंतवाडी) आणि राजेंद्र चव्हाण (शिरगांव) यांचा समावेश आहे. १० जानेवारीपासून होणा-या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा तसेच पुरस्कार वितरण आणि लेखकांच्या सन्मानप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन  अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर यांनी केले आहे.
You cannot copy content of this page