मुलांच्या कौशल्याला खतपाणी घाला…

शांताराम नाईक: वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न..

⚡वेंगुर्ला ता.०९-: शाळा हे देवालय आहे. पालकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करा आणि त्यांच्या कौशल्याला खतपाणी घाला असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम उर्फ अण्णा नाईक यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी केले.

  केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ८ जानेवारी रोजी शाळेच्या ‘विठाई‘ सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम उर्फ अण्णा नाईक, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, कलावलय संस्थेचे सुरेंद्र खांबकर, माजी नगरसेवक उमेश येरम, शाळेचे माजी विद्यार्थी अॅड.नंदन वेंगुर्लेकर, शिक्षणप्रेमी मोना नाईक, वासुदेव केरकर, शंकर कोरगांवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर,  उपाध्यक्ष राकेश सापळे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर आदी उपस्थित होते.

  मुलांच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. या शाळेतील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवित आहेत हे कौतुकास्पद असून शाळेसाठी आपले नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली नाहीत त्या विद्यार्थ्यांनी नाराज होऊ नका. वेळ गेलेली नाही. वेळेचा उपयोग करून उज्ज्वल यश संपादन करा असे उमेश येरम यांनी सांगितले. 

शाळेच्या भौतिक सुविधांसाठी जास्तीत जास्त आर्थिक मदत उभी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांनी सांगितले. पालकांनी मुलांच्या समोर मोबाईलचा वापर कमी करा. जेणेकरून मुलांना मोबाईलच जास्त सवय लागणार नाही असा सल्ला गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी पालकांना दिला.

  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अहवाल वाचन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर यांनी, पारितोषिकांचे वाचन शिक्षिका लिना नाईक, अनुश्री कुशे आणि मिलिद सरवदे  यांनी तर निवेदन व आभार प्रा. वैभव खानोलकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक समितीचे सदस्य, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
You cannot copy content of this page