बाबा आंगणे यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश…

⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओवळीये हिवाळे विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उद्योजक श्री. बाबा आंगणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. खास. नारायण राणे यांनी आंगणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजप मध्ये स्वागत केले. आंगणे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी पं. स. उपसभापती राजू परुळेकर, माजी जि. प. सदस्य महेंद्र चव्हाण, श्री. खांबल, प्रवीण घाडी, दया हाटले, रघुनाथ धुरी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page