नट वाचनालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा…!

⚡बांदा ता.०७-: येथील नट वाचनालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अनंत भाटे यांनी सावित्रीबाईंच्या महान कार्याची माहिती सांगितली. तसेच शंकर नार्वेकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.सावंत, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत तसेच वाचक, व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत वाचनसंवाद व बालसाहित्य ग्रंथप्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यावेळी शालेय मुलांचा पुस्तक वाचन कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बोलताना वाचनाशिवाय तरणोपाय नाही असे उद्‌गार सदस्य प्रकाश पाणदरे यांनी काढले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, सदस्य शंकर नार्वेकर, प्रकाश पाणदरे, सौ. स्वप्निता सावंत, जि.प. केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, उपशिक्षक जे. डी. पाटील, अंकुश माजगांवकर, सौ. अर्चना सावंत तसेच प्रशालेचे ६० विद्यार्थी-विद्यार्थीनी व वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून सचिव राकेश केसरकर यांनी आभार मानले.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनास उपस्थित असलेले मान्यवर व विद्यार्थी.

You cannot copy content of this page