⚡मालवण ता.०७-: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त घुमडे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून १५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दत्ता सामंत मित्रमंडळ व शिवसेना मालवण तालुका यांच्या तर्फे घुमडे येथील श्री देवी घुमडाई मंदिरात रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिराचा शुभारंभ घुमडाई मंदिरात दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. तसेच दत्ता सामंत यांनी कुटुंबासमवेत घुमडाई देवीचे दर्शन घेत साकडे घातले. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते पोलीसं निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरास घुमडे सरपंच सौ. स्नेहल बिरमोळे, माजी सरपंच दिलीप बिरमोळे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, कुंभारमाठ सरपंच सौ. पूनम वाटेगावकर, भाऊ सामंत, सूर्यकांत फणसेकर, राजू बिडये, मधुकर चव्हाण, उमेश बिरमोळे, संदीप भोजने, वाहतूक पोलीस गुरूदास परब यांच्यासह इतर उपस्थित होते.
या शिबिराला दत्ता सामंत यांचे मित्र परिवार, कार्यकर्ते व रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात १५६ जणांनी रक्तदान करत सहकार्य केले. या शिबिरादरम्यान शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच दत्ता सामंत यांचे मित्रमंडळी, हितचिंतक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
