वेंगुर्ला येथे १५ ते १९ रोजी वारकरी कीर्तन महोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला तालुका समस्त वारकरी संप्रदायातर्फे दि.१५ ते दि. १९ जानेवारीपर्यंत वेंगुर्ला रामेश्वर मंदिर येथे रोज सायंकाळी ७ वा. वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दि.१५ रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माने हेरवाडकर (हेरवड), दि.१६ रोजी ह.भ.प.सोपानकाका मुळे माऊली (मुंबई), दि.१७ रोजी ह.भ.प.भूषण महाराज वरखले (रायगड), दि.१८ रोजी ह.भ.प.आनंद महाराज जाधव (करमळा), दि.१९ रोजी ह.भ.प.गणेश महाराज शिवगण (खेड-रत्नागिरी) आदी कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहे. यांना ऋषर महाराज सुतार आणि दिगंबर दादा कदम हे पखवाज साथ तर ह.भ.प.प्रथमेश महाराज मेस्त्री आणि ह.भ.प.विघ्नेश महाराज मेस्त्री हे गायनाचार्य म्हणून साथ करणार आहेत. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन वेंगुर्ला तालुका वारकरी संप्रदायातर्फे केले आहे.

You cannot copy content of this page