संग्राम कासले, केशव (भाऊ) भोगले, झुंजार पेडणेकर यांना पत्रकार पुरस्कार..
⚡मालवण ता.०४-:
मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार समितीच्या बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले असून या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार समिती व पत्रकार अमित खोत पुरस्कृत ‘बेस्ट स्टोरी अवार्ड’ हा विशेष पुरस्कार पत्रकार झुंजार पेडणेकर
यांना जाहीर करण्यात आला आहे.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये जेष्ठ पत्रकार सुरेश ठाकुर व नितीन आचरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर यावर्षीचा मालवणरत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या 100 इडीयट यां ग्रुपला देऊन सन्मानित केले जाणार आहे. तर कलारत्न या पुरस्काराने साई पारकर यांचा सन्मान होणार आहे.
आमदार निलेश राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या प्रमुख उपस्थित या पुरस्कारांचा वितरण सोहळा लवकरच संपन्न होणार आहे.
मालवण तालुका पत्रकार समिती बैठकीत पुरस्कार निवड निश्चित झाली. यावेळी अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौंगंध बादेकर, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ढोलम, तालुका उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव संदीप बोडवे, महेश सरनाईक, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, मनोज चव्हाण, विशाल वाईरकर, भाऊ भोगले, परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर, उदय बापार्डेकर, समीर म्हाडगुत, गणेश गांवकर, आप्पा मालंडकर, उदय बापार्डेकर, भूषण मेतर आदी उपस्थित होते.
मालवण पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत घेण्यात आलेल्या इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेत विजेते ठरलेल्या प्रफुल्ल देसाई, भाऊ भोगले, दत्तप्रसाद पेडणेकर यांचा पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मान होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष संतोष गावडे व सचिव सौंगंधबादेकर यांनी दिली.
