आरोग्य पथकाकडून आढावा घेत केल्या मार्गदर्शक सूचना
*💫कणकवली दि.१९-:* जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली रेल्वे स्थानकाला भेट देत आरोग्य पथकाकडून कामकाजाचा आढावा घेतला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनप्रमुख असलेल्या जिल्हाधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखणारे डीएसपी हे एकजुटीने फिल्डवर उतरताना दिसत आहेत. आज सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास कलेक्टर के.मंजुलक्ष्मी, एसपी राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली रेल्वे स्टेशन ला सरप्राईज भेट देत रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या आरोग्य पथकाकडून प्रवाशांच्या केल्या जाणाऱ्या तपासणीची माहिती घेतली. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, तालुकाआरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ आदी उपस्थित होते.
